शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील महानगरांमधल्या सदनिकांच्या विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 19:03 IST

पुण्यासह देशभरातील महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील विक्रीत १२ टक्क्यांनी झाली वाढ

पुणे : केंद्र सरकारनेघरबांधणीला दिलेले प्रोत्साहन... परवडणाºया घरांसाठी देऊ केलेल्या सवलती यामुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. पुण्यासह देशभरातील महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यामध्येच सदनिकांच्या विक्रीत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे जानेवारी २०१९ अखेरीस २३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत २४ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दीष्ट मुद्रांक विभागाला दिले होते. जानेवारीमध्येच उद्दीष्ट टप्प्यात आल्याने, राज्य सरकारने २५ हजार कोटी रुपयांच्या महसुलवाढीचे सुधारीत उद्दीष्ट दिले आहे. बांधकाम व्यवसायात वृद्धी झाल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. नोटबंदी, रेरा कायदा आणि जीएसटी अशा पाठोपाठ आलेल्या बदलांमुळे बांधकाम व्यवसायासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातून बांधकाम क्षेत्र सावरत असल्याचे दिसून येत आहे. या बाबत माहिती देताना मालमत्ता सल्लागार अनुज पुरी म्हणाले, केंद्रशासीत प्रदेश, मुंबई महानगर, बेंगळुरु, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये २०१८मध्ये १ लाख ९५ हजार ३०० नवीन सदनिका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यातील २ लाख ४८ हजार ३०० घरांची विक्री झाली. सदनिकांच्या विक्रीत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये ३३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.  गेल्यावर्षी नव्याने बांधलेल्या सदनिकांपैकी ७७ हजार ५९० सदनिका या चाळीस लाख रुपयांच्या आतील, तर ७० हजार ७० सदनिका या चाळीस ते ८० लाख रुपयांच्या दरम्यानच्या आहेत. सदनिकांची उभारणी आणि विक्रीचा विचार केल्यास सदनिकांच्या संख्येत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, विक्री १८ टक्क्यांनी वाढली आहे. चेन्नई (१७ टक्के घट) वगळता इतर सहा ठिकाणी घरांच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. बेंगळुरुत मागणीत सर्वाधिक ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

२०१८ मधील किंमती निहाय            सदनिकांची उपलब्धतासदनिकांची श्रेणी                  २०१८चाळीस लाखांखालील         ७७,५९०४० ते ८० लाख            ७०,०७०८० लाख ते दीड कोटी        ३०,३००दीड ते अडीच कोटी                   ९,४१०अडीच कोटी            ७,९३०एकूण                १,९५,३००

टॅग्स :PuneपुणेHomeघरCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकार