दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:37 IST2025-10-15T10:36:57+5:302025-10-15T10:37:14+5:30
शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश
पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचच्या हद्दीतील १८ सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तडीपारीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, कारवाई केलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे. गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार कारवाई करण्यासह त्यांची बँक खाती गोठवण्यात येत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी हद्दीतील काळेपडळ, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, लोणी-काळभोर, हडपसर, फुरसुंगी, मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १८ सराईतांवर तडीपारची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तडीपारची कारवाई केलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
तडीपार केलेल्या सराईतांची नावे
कानिफनाथ शंकर घुले (४९ रा. महमंदवाडी) प्रमिला सचिन काळकर (४१ रा. महमंदवाडी) रफिक उर्फ टोपी मेहमूद शेख (५५ रा. कोणार्क सोसायटी, कोंढवा) गब्बू सनी प्रकाश परदेशी (३३, रा. वानवडी) मौला उर्फ मौलाना रसूल शेख (२२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) गणेश तुकाराम घावरे (२८, रा. काकडेवस्ती कोंढवा बुद्रूक) नंदा प्रभू बिनावत (५०, रा. बिबवेवाडी) अविनाश उर्फ तावू अर्जुन जोगन (२७, रा. अप्पर बिबवेवाडी) सारंग बबन गायकवाड (३०, रा. अप्पर बिबवेवाडी) उमेश उर्फ टकाभाऊ निवृत्ती राखपसरे (५०, रा. थेउर फाटा, हवेली) विनायक आदिकराव लावंड (३१, रा. लोणी काळभोर) शुभम सुदाम विरकर (२५, रा. विरकरवस्ती, लोणी काळभोर) रोहन सोमनाथ चिंचकर (२७, रा. गाडीतळ, हडपसर) बापू सुरेश मकवाना (२१, रा. हडपसर) अनिकेत राजेश शेलार (२२, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) दत्ता गणेश गायकवाड (३६, रा. मुंढवा) दीपक उर्फ कव्वा गणेश गायकवाड (३८, रा. मुंढवा) अमोल राजेंद्र तट (४५, रा. पापडेवस्ती, भेकराईनगर)