Railway: रविवारी मुंबईत १८ तासांचा ब्लॉक, डेक्कन व डेक्कन क्विन एक्स्प्रेस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 13:23 IST2021-12-18T13:08:55+5:302021-12-18T13:23:23+5:30

पुणे : ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान पाचवी व सहावी मार्गिकेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी १८ तासाचा ब्लॉक घेतला ...

18 hour block in mumbai deccan and deccan queen express canceled sunday | Railway: रविवारी मुंबईत १८ तासांचा ब्लॉक, डेक्कन व डेक्कन क्विन एक्स्प्रेस रद्द

Railway: रविवारी मुंबईत १८ तासांचा ब्लॉक, डेक्कन व डेक्कन क्विन एक्स्प्रेस रद्द

पुणे : ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान पाचवी व सहावी मार्गिकेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी १८ तासाचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहे. रद्द करण्यात आलेल्या गाडीत पुण्याहून सुटणारी पुणे-मुंबई डेक्कन व डेक्कन क्वीन एक्स्प्रेस याचा देखील समावेश आहे. त्यामुळे रविवारी ह्या दोन गाड्या धावणार नाहीत. तसेच मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस देखील रद्द केली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

रविवारी सकाळी ८ वाजता ब्लॉकला सुरुवात होईल. रविवारी मध्य रात्री दोन वाजता हा ब्लॉक संपणार आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर देखील होणार आहे. शनिवार १८ डिसेंबर रोजी धावणारी हुब्बल्ली-दादर एक्स्प्रेस ही दादरला न जाता पुणे स्थानकापर्यंत धावेल. त्यामुळे १९ डिसेंबरला ही गाडी पुण्याहून सुटेल.

रविवारी या दोन एक्सप्रेस धावणार नसल्याने प्रवाशांना प्रवासासाठी पर्याय शोधावा लागणार आहे. मुंबईत होणाऱ्या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

Web Title: 18 hour block in mumbai deccan and deccan queen express canceled sunday