लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन बलात्कार; पीडितेच्या आईसह मित्रावर गुन्हा

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 2, 2024 16:24 IST2024-05-02T16:23:34+5:302024-05-02T16:24:21+5:30

बलात्कार करुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला...

17-year-old minor raped by lure of marriage; Crime against friend including victim's mother | लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन बलात्कार; पीडितेच्या आईसह मित्रावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन बलात्कार; पीडितेच्या आईसह मित्रावर गुन्हा

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीने बुधवारी (दि.०१) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीच्या आईसह अविनाश शेळके, गोविंद काकडे (दोघे रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०२४ मध्ये पीडित मुलीच्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. पीडिता ही एका कापड दुकानात काम करते. दुकानात काम करत असताना आरोपी अविनाश शेळके याच्यासोबत तिची ओळख झाली. अविनाश याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवताना तिचे न्युड फोटो मोबाईलमध्ये काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार तीच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, आईचा मित्र गोविंद काकडे याने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन केले. तसेच ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घरी येऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलीने आईला सांगितले. त्यावेळी आईने गोविंद याचे नाव कोठेही घेयचे नाही असे सांगून मुलीला बेदम मारहाण केली. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

 

 

Web Title: 17-year-old minor raped by lure of marriage; Crime against friend including victim's mother