पर्स, चप्पल चोरल्याचा आरोप सहन न झाल्याने घरकाम करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:11 IST2022-01-01T13:06:47+5:302022-01-01T13:11:36+5:30

पायल ही मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार म्हणून काम करत होती...

17 year old housemaid commits suicide after being accused stealing slippers purse | पर्स, चप्पल चोरल्याचा आरोप सहन न झाल्याने घरकाम करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पर्स, चप्पल चोरल्याचा आरोप सहन न झाल्याने घरकाम करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणेपुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालकिनीने चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी घर मालक महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पायल बाबू चव्हाण (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी घर मालक असलेल्या पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पायल ही मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार म्हणून काम करत होती. परंतु पल्लवी यांनी पायल हिच्यावर पर्स आणि चप्पल चोरीचा आळ घेतला होता. तसेच तिला वारंवार त्रास देखील दिला होता. चोरीचा आळ आणि होणारा त्रास सहन न झाल्याने पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: 17 year old housemaid commits suicide after being accused stealing slippers purse