१६ हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: June 26, 2015 04:24 IST2015-06-26T04:24:22+5:302015-06-26T04:24:22+5:30

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी परिसरात बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या पाच विक्रेत्यांवर कारवाई केली.

16 thousand gutkha seized | १६ हजारांचा गुटखा जप्त

१६ हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी परिसरात बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या पाच विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडील १६ हजार ७३३ रुपयांचा माल जप्त केला. बंदी असताना गुटखा विक्री केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनातील पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सात जणांच्या पथकाने ही कारवाई केली.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुरुवारी पिंपरी परिसरात कारवाई करण्यात आली. किरण पुंडलिक गायकवाड यांच्या टपरीतील गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. दिलीप पाटील, घनश्याम धनानी, फिरोज मोहमुद्दीन शेख, डी. के. राजन यांच्या पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. शासनाने बंदी घातली असताना गुटख्याचा साठा आणि विक्री केल्याचे आढळून आले. पंचनामे करून त्यांच्याकडील गुटख्याचा साठा ताब्यात घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 16 thousand gutkha seized