शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

काेंबड्यांची झुंज 16 जणांना पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:49 PM

काेबड्यांची झुंझ लावून जुगार खेळणाऱ्या 16 जणांना पाेलिसांनी अटक केली अाहे.

पुणे : ग्रामीण भागात कोंबड्याची झुंज लावली जात असल्याचे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो़ पण, पुणे शहरापासून जवळच असलेल्या भुगाव येथील मुकाईवाडी गावातील निसर्ग लॉज येथे कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळला जात होता़. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेथे छापा घालून १६ जणांना पकडले आहे़ त्यांच्याकडून जुगाराची साधने व तब्बल १ लाख ५ हजार ६९० रुपये जप्त केले आहेत़.     रात्रीच्या वेळी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली़ पोलीस अधीक्षक संदीप पाटील व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मुकाईवाडी येथील निसर्ग लॉजवर पहाटे २ वाजता छापा घातला़ तेथे ८ ते १० कोंबडे होते़ या सर्व कोंबड्यांना प्रशिक्षित केले असते़ त्यांच्या पायाच्या पंजाला ब्लेड बांधले जाते़ मग त्यांची झुंज लावली जाते़ त्यांच्यापैकी कोणता कोंबडा जिंकेल असे वाटते त्यावर इतर जण पैसे लावतात़ कोंबडे हे हवेत उडी मारुन दुसऱ्या कोंबड्यावर पंजा मारतात़ पंजाला ब्लेड लावलेले असल्याने त्यात कोंबडे जखमी होतात़.

     राजेश रई, अरुण सरोदे, प्रकाश पुजारी, विश्वनाथ शेट्टी, गंगाधर कोरायन, हरीश पुजारी, नारायण पवार, सुरंदर हेगडे, संदीप शेट्टी, वासू खरकेरा, रविंदर सिंग, मकरंद घाडगे, सायन छत्री, कुबेर अधिकारी, बाळकृष्ण इलतवारी, दयानंद पुजारी हे त्यांचे साथीदार प्रसन्ना शेट्टी, अण्णा यांनी मिळून ही कोंबड्याची झुंज लावली होती़ त्यांनी कोंबड्यांना निदर्यतेने वागून त्यांचे झुंजीवर पैसे लावून जुगार खेळल्याबदद्ल पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ तसेच निसर्ग लॉजचे चालक प्रसन्न शेट्टी  व त्यांचा मॅनेजर गंगाधर कोरायन या दोघांनी लॉजवर विना परवाना विदेशी दारुच्या ४१ बाटल्या बाळगल्याचे आढळून आले असून त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसnewsबातम्या