शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

युवानच्या उपचारासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुर्धर आजार असलेल्या मुंबईतील तीरा कामत या बाळाच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दुर्धर आजार असलेल्या मुंबईतील तीरा कामत या बाळाच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार होता. त्यामुळे तीराच्या पालकांनी ‘क्राऊड फंडिंग’ची मोहीम चालवली. त्यास जगभरातून प्रतिसाद मिळाला. त्याच पद्धतीने आमच्याही युवान बाळासाठी मदत करा, अशी साद पुण्यातल्या रामटेककर कुटुंबीयांनी घातली आहे.

रूपाली रामटेककर यांचा एकुलता एक मुलगा युवान एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. युवानच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती रूपाली यांनी केली आहे.

‘एसएमए टाइप १’ हा आजार बरा करण्यासाठीचा खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचा असतो. हाच स्पायनल मस्क्युलर एट्रोफी या प्रकारचा अतिदुर्मिळ आजार युवानला झाला आहे. या आजारासाठी ‘झोलजेंस्मा’ नावाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु ते अमेरिकेवरून मागवावे लागते. त्या एका इंजेक्शनचा खर्च सोळा कोटी रुपये आहे.

तीरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुंबईतल्या बाळाला हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती. तिला जगभरातून मदत झाली. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारनेही या औषधावरील आयात कर माफ केला. याचप्रमाणे युवानवरदेखील औषधोपचार झाल्यास त्याचा आजार पूर्ण बरा होण्याची खात्री डॉक्टर देत आहेत. युवान सध्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्याही उपचारासाठी एकूण १६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

चौकट

“उपचाराची रक्कम खूप मोठी असल्याने आम्ही सर्वांकडून मदत घेत आहोत,” असे युवानच्या आई रूपाली रामटेककर यांनी सांगितले. नागरिकांनी मदत करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या वैद्यकीय मदतीवर आयकर सवलत दिली जाणार आहे. https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-yuvaan