पशुसंवर्धन योजनेत राज्यासाठी १५ हजार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:30+5:302021-06-18T04:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेमध्ये ...

15,000 crore fund for the state in animal husbandry scheme | पशुसंवर्धन योजनेत राज्यासाठी १५ हजार कोटींचा निधी

पशुसंवर्धन योजनेत राज्यासाठी १५ हजार कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे. तरी राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

केंद्र शासनाने सन २०२०-२१ या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सदर योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया उद्योग आईस्क्रिम, चीजनिर्मिती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर तर मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग-व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याज दरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर http://dahd.nic.in/ahdf उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

केंद्र शासनाने वर नमूद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था यांना लाभ घेता येणार आहे. त्यानुसार जास्तीत जास्त इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

Web Title: 15,000 crore fund for the state in animal husbandry scheme