लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:20 IST2022-09-13T13:15:04+5:302022-09-13T13:20:01+5:30
१५ वर्षांच्या मुलीची स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद

लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षांच्या तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. याप्रकरणी गुलटेकडी येथील एका १५ वर्षांच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी कुलदीप मगर (वय २५, रा. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा असून त्याने फिर्यादीला लग्न करतो, असे सांगून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. ती ६ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.