टाव्हरेवाडी येथे विषबाधा होऊन १५ मेंढ्या दगावल्या, मेंढपाळाचे साडेतीन लाखांचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 22:06 IST2025-10-15T22:05:39+5:302025-10-15T22:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अवसरी: आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक बुधा चोरामले या मेंढपाळाच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने ...

टाव्हरेवाडी येथे विषबाधा होऊन १५ मेंढ्या दगावल्या, मेंढपाळाचे साडेतीन लाखांचे नुकसान!
लोकमत न्यूज नेटवर्क
अवसरी: आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक बुधा चोरामले या मेंढपाळाच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळाचे अंदाजे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
टाव्हरेवाडी येथे बुधा बारकू चोरमले हे मेंढपाळ नेहमीप्रमाणे या परिसरात आपल्या दोनशे शेळ्या मेंढ्या चारत असताना आज सुमारे चारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली पावसात मेंढ्या एकाच जागेवर उभ्या होत्या, अचानक या मेंढ्या थरथर कापायला लागल्या व त्यांचे पोट फुगून खाली पडायला लागल्या. या घटनेची माहिती मिळतच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.संजय हिंगे, प्रज्वल हिंगे, बापू टाव्हरे, अक्षय विश्वासराव व व ग्रामस्थांनी तात्काळ या शेळ्या मेंढ्यांना औषधे देण्यास मदत केल्याने अनेक शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडण्यापासून वाचविण्यात यश आले आहे.
मात्र सुमारे १५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. शेळ्या मेंढ्यांना खाण्यात विषबाधा झाली असावी असे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती नवनाथ टाव्हरे यांनी तहसीलदार संजय नागटिळक यांना दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कोंढवळे यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले मात्र अंधार पडल्याने पंचनामा होऊ शकला नाही, उद्या त्यांचा पंचनामा करण्यात येणार आहे.
बुधा चोरमले यांचे दोन दिवसापूर्वी एक शेळी बिबट्याने ठार मारली होती आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा एकदा शेळ्या चारत असताना बिबट्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केले आहे वन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असली तरी १५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने चोरामले यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी बापू टाव्हरे यांनी केले आहे.