शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

SSC Result 2025: राज्यातील १३,७०९ विद्यार्थ्यांना दहावीच्या पुरवणी परीक्षेत यश; गतवर्षीच्या तुलनेत ०.३० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:27 IST

राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे.

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २९) जाहीर झाला. त्यानुसार राज्यात १३,७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ३८,७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३७,५७६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले हाेते. यंदाच्या निकालाची टक्केवारी ३६.४८ असून, गतवर्षीच्या तुलनेत (३६.७८) यात ०.३० टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

सदर पुरवणी परीक्षा दि. २४ जून ते ०८ जुलै दरम्यान पार पडली. यात एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १३,३८९ एवढी हाेती. नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जून-जुलै २०२५ च्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झाले हाेते.

या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १.०० वाजता मंडळाच्या https://www.mahahsscboard.in  आणि http://sscresult.mkcl.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल डाउनलाेड करता येणार आहे.

पुरवणी परीक्षेतही मुलींचीच बाजी

दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचीच संख्या अधिक असते. यंदाही त्याचा प्रत्यय आला. आता पुरवणी परीक्षेतही मुलींचा टक्का अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे.

विभाग - नाेंदणी झालेले विद्यार्थी - प्रविष्ट - उत्तीर्ण

पुणे - ७६७१ - ७४२३ - १९०९नागपूर - ४७१५ - ४६२२ - २०१८

छत्रपती संभाजीनगर - ४६८३ - ४५६० - २१६२मुंबई - ९५८१ - ९२२४ - १७९२

काेल्हापूर - २३०३ - २२५६ - ४९६अमरावती - २३३३ - २२७१ - १११९

नाशिक - ४५३० - ४४३६ - २८५३लातूर - २६९७ - २५९६ - १३०८

काेकण - १९१ - १८८ - ५२

विभागनिहाय मागील वर्षाच्या तुलनेत निकालामध्ये झालेला चढ-उतार

विभाग - यंदाची (२०२५) टक्केवारी - मागील (२०२४) वर्षाची टक्केवारी

पुणे - ३५.७१ - २८.६०

नागपूर - ४३.६६ - ४९.९१छत्रपती संभाजीनगर - ४७.४१ - ४९.९४

मुंबई - १९.४२ - २७.७६काेल्हापूर - २१.९८ - ३२.८१

अमरावती - ४९.२७ - ४०.२१नाशिक - ६४.३१ - ५२.०६

लातूर - ५०.३८ - ५०.३४काेकण - २७.६५ - ४२.५४

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र