महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:56 PM2022-07-15T19:56:17+5:302022-07-15T19:57:35+5:30

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या २७ जणांना अटक कारवाया करण्यात आल्या आहेत.

13.08 Crore Scam Revealed by Maharashtra GST Department Businessman arrested in Pune | महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक

googlenewsNext

पुणे : कोणतीही खरेदी विक्री न करता ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन टँक्स क्रेडीट पास आॅन करणा-या पुण्यातील मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने छापा मारला आहे. या प्रकरणात १३.०८ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. शासनाच्या महसूलाची हानी करणा-या व्यापा-याला विभागाने अटक केली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या २७ जणांना अटक कारवाया करण्यात आल्या आहेत.

मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीचा मालक दौलत शिवलाल चौधरी याला १३ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगिरी करणा-या व्यापा-यांचा कसून शोध घेत आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडून बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पथकाला पुण्यातील स्क्रॅप आणि स्टीलच्या मालाची खरेदी विक्री करणा-या मे.शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीच्या व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडून या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या तपासणीत या कंपनीने कोणत्याही वस्तुंचा प्रत्यक्षात व्यापार किंवा खरेदी विक्री केले नसल्याचे आढळून आले.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाने याबाबत केलेल्या सखोल तपासणीत या कंपनीने ७२.६८ कोटी रुपयांच्या खोटया पावत्यांचा वापर करुन बेकायदेशीर मार्गाने १३.०८ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे उघडकीस आले. दरम्यान, चौधरी याला पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पुणे राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त हृषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी केली. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून जीएसटी अन्वेषण पुणे विभागीय अधिका-यांनी करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये पुणे विभागात आत्तापर्यंत एकूण ६ जणांना अटक केली आहे.

Web Title: 13.08 Crore Scam Revealed by Maharashtra GST Department Businessman arrested in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.