१३ वर्षाच्या मुलाने वडिलांच्याच पोटात खुपसला चाकू; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 21:12 IST2021-05-20T21:12:13+5:302021-05-20T21:12:30+5:30

भावंडांच्या भांडणात मारल्याने रागात केले कृत्य, जांभुळवाडी येथील घटना...

A 13-year-old boy was killed father; Shocking incident in Pune | १३ वर्षाच्या मुलाने वडिलांच्याच पोटात खुपसला चाकू; पुण्यातील धक्कादायक घटना

१३ वर्षाच्या मुलाने वडिलांच्याच पोटात खुपसला चाकू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : भावंडांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये वडील रागविल्यामुळे १३ वर्षाच्या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव येथील जांभुळवाडी रोड येथे घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

दस्तगीर इमाम शेख (वय ४०, रा. सिद्धीविनायक सोसायटी, जांभुळवाडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. 

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, दत्तगीर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दत्तगीर यांना चार मुले आहेत. मोठा मुलगा व त्याची बहीण यांच्यामध्ये भांडणे सुरु झाली होती. दोघांची भांडणे सोडविण्यासाठी दस्तगीर गेले होते. मोठ्या १३ वर्षाच्या मुलाला भांडणाबद्दल रागावून त्यांनी त्याला मारले. त्यामुळे या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसला. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: A 13-year-old boy was killed father; Shocking incident in Pune