पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रद्द; प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 20:46 IST2025-05-08T20:44:49+5:302025-05-08T20:46:47+5:30

पुणे विमानतळावरून होणाऱ्या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून, गुरुवारी विविध मार्गांवरील १३ विमान सेवा रद्द करण्यात आल्या

13 flights cancelled from Pune airport; passengers given full refund and alternative arrangements | पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रद्द; प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था

पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रद्द; प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था

-अंबादास गवंडी

पुणे :
ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर उत्तरेकडील काही महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पुणे विमानतळावरून होणाऱ्या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून, गुरुवारी विविध मार्गांवरील १३ विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. ८) १३ मार्गांवरील इंडिगो, स्पाइसजेट विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रवासी प्रभावित झाले असून, त्यांना याची कल्पना देण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या व अन्य संबंधित यंत्रणा तत्पर झाल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या बुकिंगनुसार वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यात आला असून, घोषणा वाहिन्यांद्वारे, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. प्रभावित प्रवाशांबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्ण रकमेची परतफेड, किंवा अन्य पर्यायी उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

सध्याची स्थिती ही पूर्णपणे संरक्षणविषयक गरजांमुळे उद्भवलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. प्रवाशांनी त्यांच्या तिकीट बुकिंग संबंधित प्रश्नांसाठी थेट संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही विमानतळ प्रशासनाने केले आहे.

रद्द झालेली उड्डाणे : (इंडिगो)

- अमृतसर - पुणे (६ ई ६१२९)

-⁠ पुणे - कोचीन (६ई ६१२९)

-⁠ चंदीगढ - पुणे (६ई ६८१)

- ⁠पुणे - हैदराबाद ६ई ३३६

- राजकोट (हिरासर) - पुणे (६ई ९५७)

- ⁠पुणे - जोधपूर (६ई १३३)

- ⁠पुणे - चंदीगढ (६ई २४२)

- ⁠पुणे - अमृतसर (६ई ७२१)

- ⁠पुणे - राजकोट (हिरासर) (६ई ९५६)

- ⁠पुणे - सुरत (६ई ६१९१)

- ⁠जोधपूर - पुणे (६ई ४१४)

रद्द झालेली उड्डाणे : (स्पाइसजेट फ्लाइट्स)

- पुणे - भावनगर (एसजी १०७७)

- ⁠पुणे - जयपूर (एसजी १०८०)

Web Title: 13 flights cancelled from Pune airport; passengers given full refund and alternative arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.