शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइनने घेतले जिल्ह्यात १२ जणांचे बळी

By admin | Updated: March 17, 2015 23:14 IST

नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅलर्ट झाले आहे.

पुणे : नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमीफ्लूचा आवश्यक साठा असून, लहान मुलांसाठी ‘सायरस’ हे सिरफही उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेकडून १६० बाटल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५० बाटल्या उपलब्ध झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात सिरपही उपलब्ध होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ते उपलब्ध करून देण्याचे देशमुख यांना सांगितले होते. त्यानुसार १६० बाटल्या जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये बारामती, इंदापूर, खेडला प्रत्येकी २; तर आंबेगाव, हवेली, जुन्नर, मावळ, पुरंदर, दौंडला प्रत्येक १ रुग्णाचा मृत्यू झाला. यात नऊ पुरुषांचा व ३ महिलांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूबाधित रुग्णांमध्ये १५ ते ५० वयोगटातील ७४ पैकी ५३ रुग्णांचा समावेश आहे. ५०च्या पुढे १३ व ० ते १४ वयोगटातील ८ रुग्ण सापडले. ११ मृत रुग्णांपैकी रुबीमध्ये ३ , नोबलमध्ये ३, पूना हॉस्पिटल २ , के.ई.एम १, वायसीएम १ , आदित्य बिर्लामध्ये १ रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)हवेलीत सर्वाधिक ३६ जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी हवेली तालुक्यात सर्वाधिक ३६ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर इंदापूरला ७, खेडला ७, बारामतीला ५, आंबेगाव, भोर, मावळ, पुरंदर, शिरूरला प्रत्येकी ३; तर दौंड, जुन्नर, मुळशीला २ रुग्ण सापडले. टॅमीफ्लूचा मुबलक साठाजिल्ह्यात प्रत्येक केंद्रावर टॅमीफ्लूच्या ४०० गोळ््या उपलब्ध आहेत. ४० रुग्णांना पुरू शकतील एवढा साठा उपलब्द असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. सर्व स्तरावर प्रशिक्षणजिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही प्रशिक्षण घेतले असून, संशयित रुग्णांवर कसे उपचार करायचे, याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या व आशांनाही याबाबत माहिती दिली आहे.