शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विधानसभेत संख्याबळ कमी करण्यासाठीच १२ आमदारांचं निलंबन ! पुणे भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 13:07 IST

चोर हैं भई चोर हैं, बिघाडी सरकार चोर हैं' घोषणाबाजी करत पुण्यात भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन

ठळक मुद्देआमचे १२ आमदार काय तर १०६ आमदार पण निलंबित करा पण आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून राहू - महापौर

पुणे: विधानसभेत भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहे. भाजपने आक्रमक पवित्रा स्वीकारला बसून महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  "चोर हैं भई चोर हैं, बिघाडी सरकार चोर है यांसारख्या घोषणाबाजी करत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विधानसभेत भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप देखील केला आहे.

भाजप आमदारांचं निलंबन रद्द करा, अशी प्रमुख मागणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्राभर आज भाजपनं आंदोलने करत आहेत. काल विधानसभेच्या पहिल्याच सत्रात भाजप आमदारांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केली. विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये घुसून शिवीगाळ केल्याचाही आरोप या आमदारांवर करण्यात आलाय. शाब्दिक वाद ते अक्षरशः राड्यात चर्चा कोलमडून पडली. ज्यामुळे आशिष शेलार, गिरीश महाजन या प्रमुख नेत्यांसह इतर दहा आमदारांवर एक वर्ष निलंबनाची कारवाई झाली आहे. 

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, छगनभुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण ओबीसी समाजाचे नेते म्हणवून घेतात आणि समाजाच्या मतांवर निवडून येतात. पण आजपर्यंत ते आणि महाविकासआघाडीतले ओबीसी नेते आरक्षण मिळवून देण्यात आपयशी ठरले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी ते दबावही आणू शकलेले नाही. सरकार आणि भुजबळ हे तर आरक्षण मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. भुजबळ यांना भाजप विषयी तर अजिबात बोलण्याचा अधिकार नाही. आमच्या कोणत्याही आमदारानं शिवी दिली असल्याचे पुरावे नाही आणि तसं घडलं ही नाहीये.

सत्तेत आलेल्या आघडी सरकारकडून लोकशाहीचा खून - महापौर मुरलीधर मोहोळ

आमचे १२ आमदार काय तर १०६  आमदार पण निलंबित करा पण आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून राहू. कितीही दडपशाही, मोगलाई करा तरी आम्ही समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीचा खून करून सत्तेत आलेलं आघाडी सरकार असेच कामं करणार.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाjagdish mulikजगदीश मुळीकcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस