देहूत १२ एकर ऊस जळून खाक, १५ ते १६ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 03:39 PM2024-02-26T15:39:28+5:302024-02-26T15:39:59+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला

12 acres of sugarcane burnt loss 15 to 16 lakhs in dehu | देहूत १२ एकर ऊस जळून खाक, १५ ते १६ लाखांचे नुकसान

देहूत १२ एकर ऊस जळून खाक, १५ ते १६ लाखांचे नुकसान

देहूगाव: येथील काळोखे मळ्यातील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे १२ एकर ऊस जळून खाख झाला असून ९ शेतकऱ्यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काही आब्याची व नारळाच्या झाडासंह कादा पिकाचे ही नुसकान झाले आहे. ही घटना सोमवार दि. २६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून ही आग संरक्षण विभागाच्या डेपोपासुन अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर लागली होती. ही आग विझविण्यात अपयश आले असते तर मोठा अनर्थ झाला असता. यावेळी संरक्षण विभागाच्या डीएडी डेपोच्या संरक्षक कुंपनाच्या आतील बाजुला दोन अगीचे बंब व लष्कराचे जवान सज्ज होते. परंतू सुदैवाने ही आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथील शेतकरी रामदास तुकाराम काळोखे,  सचिन बाळासाहेब काळोखे, अभिजित सुदाम काळोखे, महेश मधुकर काळोखे, बबन लक्ष्मण काळोखे, खंडू सखाराम काळोखे, गणेश तुकाराम काळोखे, बाजीराव गोविंद काळोखे, गोपाळ गेणूजी काळोखे या नऊ शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. ही आग येवढी भयंकर होती की सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुनही दिसत होती. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमामात उसळत होत्या. त्यामुळे आग विझविण्यासाठी कोणी धजावत नव्हते. त्यामुळे तातडीने देहू नगरपंचायतीच्या अग्नीशमन विभागाला बोलावण्यात आले. अग्नीशमन दलाच्या ४ कर्मचाऱ्यानी एका बंबाच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. देहूगाव येथीळ काळोखे मळ्यात प्रामुख्याने शेतकरी ऊस हे नगदी पीक घेतात. हा सगळा ऊस येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जात असतो. त्यामुळे यंदा या शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या आगीमुळे या शंतकऱ्यांच्या बांधावरील आंब्याची सात आठ झाडे व नारळाची आठ ते नऊ झाडे जळाली आहेत. याशिवाय या शेताच्या शेजारील शेतात असलेल्या कांदा पिकाला या आगीची झळ पोहचली आहे.

Web Title: 12 acres of sugarcane burnt loss 15 to 16 lakhs in dehu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.