इंदापूर तालुक्यात एका दिवसात तब्बल ११८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:42 IST2021-04-05T18:42:04+5:302021-04-05T18:42:42+5:30
रविवारपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ६ हजार ५७२ वर

इंदापूर तालुक्यात एका दिवसात तब्बल ११८ कोरोनाबाधित
बाभुळगाव: इंदापूर तालुक्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णंसंखेत वाढत होताना दिसत आहे. रविवार इंदापूर तालुक्यात ४८७ संशयितांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. त्यामध्ये ११८ रूग्णं कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीत इंदापूर तालुकाही आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
इंदापुर तालुक्यात रविवारपर्यंत ६ हजार ५७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून ५ हजार ७९० रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर १५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत मृत्यूचा दर २.३३ टक्के इतका आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के इतके झाले आहे. सध्या ६२९ रुग्णांवर इंदापूर व इतर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ४ एप्रिलला ४०२ संशयीतांची अँटीजेन टेस्टमध्ये ७३ रूग्ण आणि ६१ जणांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये २७ रुग्ण तर खासगी रूग्णांलयातील १८ असे मिळून एकूण रविवारी एकुण ११८ कोरोनाबाधित आढळून आले.
यामध्ये इंदापूर शहर १९, शिरसोडी १७, जंक्शन १०, निमगाव केतकी ८, भिगवण ७, पळसदेव ६, वालचंदनगर ४, वडापुरी ४,मदनवाडी ०३, कुरवली ०१, बील्टकंपनी २, काझड १,शहा १, कालठण नं.१. १, बोरी १, चांडगाव १, गलांडवाडी नं.१, अकोले १, कांदलगाव १, व्याहळी १, गोतोंडी १, पिंपरी खु.२,वरकुटे खु.२, माळवाडी नं.१.१, हिंगणगाव १, चिंदादेवी २, भांडगाव १, बेडशिंगे १, भरणेवाडी २, पडस्थळ २, कळस १, सराफवाडी १, शेळगाव १, अंथुर्णे २, विठ्ठलवाडी १, रेडा १, पिंपळे १, भिगवन स्टे.१, डिकसळ १, निंबोडी १, आनंदनगर १ असे एकूण ११८ असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.