शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

११५ शाळांची वाट जिकिरीची

By admin | Updated: March 23, 2017 04:15 IST

पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळांची शिक्षणाची वाट जिकिरीची बनलेली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांची एकूण संख्या २१६ आहे.

जेजुरी : पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळांची शिक्षणाची वाट जिकिरीची बनलेली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांची एकूण संख्या २१६ आहे. पुरंदर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार यातील सुमारे ११५ शाळा अवघड क्षेत्रात येत आहेत. तब्बल निम्म्या शाळा अवघड क्षेत्रात येत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.पुरंदर तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने नुकतेच सर्वेक्षण करून या शाळांचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा शाळांची यादीही पुणे जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलेली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शाळा अवघड क्षेत्रात येत असल्याने पुरंदर तालुकाच अतिदुर्गम व सोई-सुविधांपासून वंचित आहे की काय? अशी चर्चा आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत शासननिर्णय पारित केला आहे. त्यानुसार बदल्यांबाबतचे काही निकषही सुचवलेले आहेत. यापैकी अवघड क्षेत्रातील शाळा व सोप्या क्षेत्रातील शाळांचे वर्गीकरण करून त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एकट्याने अवघड क्षेतातील शाळा ठरवणे शक्य नसल्याने त्यांनी मुख्यालयापासूनचे शाळेचे अंतर, दळणवळणाचा अभाव, डोंगराळ दुर्गम भाग व काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती या निकषानुसार तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना अवघड व सोप्या क्षेत्रात असणाऱ्या शाळांचे वर्गीकरण करण्याबाबत सुचवले आहे.अनेक शाळांत जाण्यासाठी शिक्षकांना दळणवळणाअभावी मोठी पायपीट करावी लागत आहे व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातील शिक्षण सुरू आहे. तालुक्यातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या अनेक शाळाही अवघड क्षेत्रात घेण्यात आलेल्या आहेत. वरील निकषानुसार विचार करता तालुक्यात एकही शाळा अवघड क्षेत्रात बसू शकत नसतानाही एवढी मोठी यादी तयार झाली आहे. पाच वर्षांपूर्वी शासनाने महसूल विभागातर्फे शाळांची पटपडताळणीकेली होती. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात बोगस पटसंख्या उघडकीस आली होती. त्याच धर्तीवर अवघड क्षेत्रातील शाळा निवडताना महसूल विभाग, पंचायत विभाग, अंगणवाडी विभाग, एसटी महामंडळ आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीमार्फत शाळांचे वर्गीकरण झाल्यास वस्तुनिष्ठ व पारदर्शक ठरेल, अशी तालुक्यातील शिक्षकांत चर्चा आहे. इयत्ता सहावीचा वर्ग सुरू करण्यासाठी परिसरात तीन किलोमीटरच्या अंतरापर्यंत सहावीचा वर्ग असणारी दुसरी शाळा असल्यास परवानगी मिळत नाही. याचाच अर्थ १२ वर्षांचा विद्यार्थी तीन किलोमीटरवरील शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणे अपेक्षित आहे. असे असतानाही पुरंदरच्या शिक्षण विभागाला अर्धा ते तीन किलोमीटरवरील शाळा अवघड क्षेत्रातील का वाटतात? की तालुक्यातील शिक्षक पुढाऱ्यांनी स्वत:च्या बदल्या न व्हाव्यात, म्हणून प्रशासनावर दबाव आणून या शाळांची यादी वाढवलेली आहे काय? यामागील नेमके गौडबंगाल काय?