लग्न होण्यापूर्वीच पत्नीकडून घेतले ११ लाख; लग्न करायचं नाही म्हणून फार्म हाऊसवर नेऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 04:28 PM2021-09-15T16:28:45+5:302021-09-15T16:28:54+5:30

तरुणीला मारहाण झाल्याची खोटी तक्रार तरुणानं पोलिसांकडे केली होती.

11 lakh taken from wife before marriage; He then tried to kill her by taking her to a farm house as he did not want to get married | लग्न होण्यापूर्वीच पत्नीकडून घेतले ११ लाख; लग्न करायचं नाही म्हणून फार्म हाऊसवर नेऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

लग्न होण्यापूर्वीच पत्नीकडून घेतले ११ लाख; लग्न करायचं नाही म्हणून फार्म हाऊसवर नेऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणीवर उपचार झाल्यानंतर पोलिसांची चौकशी सुरु केल्यावर खरा प्रकार आला समोर

पुणे : भावी पत्नीने दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करु नये, म्हणून तरुणीला जेवायला नेण्याच्या बहाण्याने बंद फार्म हाऊसवर नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणानं पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

आरिफ इसाक शेख (वय २९, रा. मेयफेअर एलिगेट, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका २७ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

 तरुणी आणि आरिफ शेख यांचं लग्न जमलं आहे. या दरम्यान, शेख यानं आपल्या भावी पत्नीकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून ११ लाख रुपये घेतले आहेत. १६ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांना शेख यानं जेवण्याच्या बहाण्यानं सासवड रोडच्या कडेला असलेल्या एका बंद फार्म हाऊसवर नेले. तेथे तरुणीनं दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये तसेच त्याच्याशी लग्न करु नये असं त्याने सांगितले. त्याला तरुणीनं नकार दिल्यावर जड वस्तूने तरुणीच्या डोक्यामध्ये वार केला. तसेच चॉपरसारख्या हत्याराने गळ्यावर, मानेवर, हातावर, दंडावर, मांडीवर वार करुन गंभीर जखमी केलं. यावेळी या तरुणीनं पुन्हा पैसे मागणार नाही, असं सांगितल्यावर तिला रुग्णालयात दाखल केले होते. तरुणीला मारहाण झाल्याची खोटी तक्रार तरुणानं पोलिसांकडे केली होती.

तिच्यावर उपचार झाल्यानंतर पोलिसांची चौकशी सुरु केल्यावर खरा प्रकार समोर आला. आता तरुणीनं तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरिफ शेख याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

Web Title: 11 lakh taken from wife before marriage; He then tried to kill her by taking her to a farm house as he did not want to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.