Pune: दहावीच्या विद्यार्थ्याला चौघांनी केली बेदम मारहाण, कात्रज भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 10:03 IST2024-03-11T10:02:32+5:302024-03-11T10:03:01+5:30

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला....

10th student brutally beaten up by four, incident in Katraj area | Pune: दहावीच्या विद्यार्थ्याला चौघांनी केली बेदम मारहाण, कात्रज भागातील घटना

Pune: दहावीच्या विद्यार्थ्याला चौघांनी केली बेदम मारहाण, कात्रज भागातील घटना

पुणे : वर्गात झालेल्या भांडणातून दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका विद्यार्थ्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र दहावीची परीक्षा देऊन दोन दिवसांपूर्वी आंबेगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरातील पीएमपी बसथांब्यावर थांबले होते. विद्यार्थी आणि त्याचा मित्र पीएमपी थांब्यावर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी चौघे जण तेथे आले. वर्गात झालेल्या भांडणातून त्यांनी विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चौघांनी त्यांना मारहाण केली.

त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. यात तो जखमी झाला. खासगी रुग्णालयात विद्यार्थ्याने उपचार घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस हवालदार वाय. आर. खोडे तपास करत आहेत.

Web Title: 10th student brutally beaten up by four, incident in Katraj area