शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Video: स्वारगेटच्या आरोपीला पकडण्यासाठी शिरूरमध्ये १०० पोलिसांचा ताफा; ऊसाच्या शेतातही शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:46 IST

तब्बल ५० पेक्षा जास्त तास होऊनही आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही

पुणे: स्वारगेट बसस्टॅन्डमध्ये शिवशाही बसमध्येच तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता फास आवळला आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे यांनी थेट आपले गाव गाठले अशी माहिती आता समोर आली आहे. सीसीटीव्ही तपासातूनही पोलिसांच्या हाती या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांची पथकं आरोपी दत्ता गाडेचे गाव गुनाट या गावात जाऊन पोहोचले आहे. गुनाट हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी दत्ता गाडे याच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याच गावातल्या एका घरात आरोपी शेवटचा दिसला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

तब्बल ५० पेक्षा जास्त तास होऊनही आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. आता शिरूर तालुक्यात थेट १०० पोलिसांच्या ताफ्याची गाडी दाखल झाली आहे. आरोपी गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उसाच्या शेतातही पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. गाडेला शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हानच  राहिले आहे. 

ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं. इतकच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील प्यायला असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे. यातील काही पथक आरोपीच्या गुणाट या गावात ठाण मांडून बसली आहेत. या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातो. पोलिसांच्या मदतीला श्वानपथक देखील आहे. या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसतात.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSwargateस्वारगेटPoliticsराजकारणWomenमहिलाMolestationविनयभंग