Corona Vaccination: पुण्यात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ पासून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:13 IST2021-09-08T19:06:11+5:302021-09-08T19:13:40+5:30
दरम्यान शहरात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार नाही.

Corona Vaccination: पुण्यात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ पासून सुरु
पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी ४ अशा ६० लसीकरण केंद्रांवर गुरुवारी प्रत्येकी १०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान शहरात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार नाही.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना(१६ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.