राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 12:56 IST2018-08-18T12:55:05+5:302018-08-18T12:56:00+5:30

राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (दि.१५) खेळत असताना दुपारी बेपत्ता झाला होता.

The 10-year boy murder who was missing from Rajgurunagar | राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून

राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून

ठळक मुद्देमुलाला चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची आरोपीची कबुली

राजगुरूनगर : स्वातंत्र्यदिनी मैदानावर मित्रांसोबत खेळत असताना बेपत्ता झालेल्या सुमित रविंद्र सावंत( वय १०, रा. राजगुरूनगर ) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याला पळवून नेत चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली या आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (दि.१५) खेळत असताना दुपारी बेपत्ता झाला होता. अज्ञात व्यक्तीने फूस लावून किंवा कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे, अशी तक्रार त्याच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि १७) दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची जोरदार चक्रे फिरवली. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याने या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून मुलाचा खून झाल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोवळ्या वयाच्या मुलाच्या खुनाबद्दल शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The 10-year boy murder who was missing from Rajgurunagar