शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात १० टक्के पाणीकपात

By admin | Updated: August 27, 2015 04:53 IST

शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, एक सप्टेंबरपासून ही कपात लागू करण्यात येणार असून, या बाबतचा

 पुणे : शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, एक सप्टेंबरपासून ही कपात लागू करण्यात येणार असून, या बाबतचा प्रस्ताव पक्षनेत्यांपुढे येत्या काही दिवसांत ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गेल्या अडीच महिन्यांत पावसाने दडी मारल्याने, तसेच परतीचा पाऊसही कमी होण्याची शक्यता असल्याने धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा शहराला पुढील वर्षभर पुरावा यासाठी १० टक्के पाणीकपात अपरिहार्य असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणात जेमतेम ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला २ वेळेस पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खडकवासला धरणातून दरदिवशी १२५० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी घेतले जाते. त्यानुसार, शहरातील काही भागांत दोन वेळेस पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागात एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. १० टक्के पाणी कपातीनंतर प्रशासनातर्फे शहरासाठी दर दिवशी ११०० एमएलडी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे धरणसाठ्यातील मिळणारे पाणी मेअखेरपर्यंत पुरेल, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र, हे पाणी पुढील वर्षी म्हणजेच सप्टेंबरअखेरपर्यंत पुरवायचे असल्याने दिवसाआड कपात करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या कामांसाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा, अशी विनंती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बांधकाम व्यावसायिकांना केली आहे. त्यासाठी क्रेडाई, तसेच मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेस महापौरांकडून पत्र देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या बचतीसाठी संघटनेनेच पुढाकार घेऊन सदस्यांना याबाबत सूचना कराव्यात, असेही महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.