--
नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) येथे राहणारे व धनगरस्थळ येथील प्राथमिक शिक्षक योगेश पोपट कर्णवर यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सोमवारी दहा लक्ष रुपयाची मदत देण्यात आली. गुळुंचे येथे त्यांची पत्नी संध्या योगेश कर्णवर यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
पुरंदर शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आकस्मित मृत्यू होणाऱ्या शिक्षकांसाठी सभासद कर्ज संरक्षण ठेव योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत सभासदांकडून १५ हजारांची ठेव घेतली जाते. या ठेवीच्या येणाऱ्या व्याजातून वर्षभरात जर कोणत्या शिक्षकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांना १० लक्ष रुपयांची मदत दिली जाते, असे संस्थेचे चेअरमन वसंत कामथे यांनी सांगितले. कर्णवर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी संध्या कर्णवर यांना संस्थेने ही मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शिक्षकांनीही ५० हजार रुपयाची रोख मदत दिली आहे.
या वेळी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कामथे,व्हाईस चेरमन सुनील कांबळे, गणेश कामठे, संदीप जगताप, सुनील लोणकर, कांचन निगडे, नाना जोशी, महादेव माळवदकर, अनिल चाचर, संदीप कदम, मनोज साटाले, शिवप्रसाद कर्णवर, नंदकुमार चव्हाण, संतोष रासकर, सुरेश जगताप, सलीम शेख, सुनील जगताप, भाऊसाहेब बरकडे, कर्नवर यांचे सासरे उत्तम धोंडीबा लवटे आदी उपस्थित होते.
या वेळी शिक्षकांनी स्वतः वर्गणी जमा करुन ५० हजाराची मदत केल्याने त्यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले.
--
चौकट
--
अनुकंपाखाली पत्नीला सेवत घेण्याची नाना जोशी, माजी राज्याध्यक्षक शिक्षक संघटना.
--
धनगरस्थळ येथेल शिक्षकी सेवेत असलेल्या योगेश कर्णवर यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दोन्ही मुलांच्या पुढील शैक्षणीक नुकसान होऊ नये, परिवाराच्या उपजीविकेसाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कर्णवर यांच्या पत्नी संध्या कर्णवर यांची शिक्षकपदासाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण असल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकी सेवेत तात्काळ घ्यावे, अशी मागणी राज्य शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष नाना जोशी यांनी केली
--
फोटो क्रमांक : १७ नीरा शिक्षकांना मदत
फोटोओळ : गुळुंचे येथील मृत शिक्षक पत्नी संध्या योगेश कर्णवर यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करताना पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंडळ व शिक्षक मित्र. (छाया : भरत निगडे,नीरा)