शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आळेफाटा येथे घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 7:05 PM

काळेशेत येथे राहत्या घरातून दीड लाखांचे दागिने व वीस हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरांनी लंपास केला.

ठळक मुद्देचोरी झाली त्यावेळी गुंजाळ कुटुंबीय शेजारी मात्र चोरीचा सुगावा नाही.

आळेफाटा : गुळुंचवाडी परिसरातील काळेशेत येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचा एक लाख सत्तर हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रविवारी  (दि. १३ एप्रिल ) रात्री अकराच्या सुमारास काळेशेत येथे सुभाष रंगनाथ गुंजाळ यांच्या राहत्या घराचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडुन आतील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दीड तोळे सोन्याचा हार, झुबे व गळ्यातील चैन असा दीड लाख रूपयांचा सोन्याचा ऐवज व वीस हजार रोख रुपए लुटून पोबारा केला.   दरम्यान चोरी झाली त्यावेळी गुंजाळ कुटुंबीय शेजारी होते. मात्र त्यांना चोरीचा सुगावा लागला नाही. चोरी झाल्याची बाब सुभाष गुंजाळ यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळे पुढील तपास करत आहे.      

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrimeगुन्हाPoliceपोलिस