राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

By मोरेश्वर येरम | Published: January 22, 2021 04:31 PM2021-01-22T16:31:53+5:302021-01-22T16:35:53+5:30

महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती.

will bring Congress to power on its own in maharashtra says Nana Patole | राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणून महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार: नाना पटोले

googlenewsNext

राज्यात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पण यासाठी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पटोले यांनी एक मोठं विधान देखील केलं आहे. 

"राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे", असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यापाठोपाठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. यासाठी नाना पटोले, काँग्रेस नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत. यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत खुद्द नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तत्पर असल्याचं म्हटलं. 

पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

"आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल", असं नाना पटोले म्हणाले. 

नाना पटोलेंचं नाव हायकमांडकडून निश्चित?
राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आघाडीवर आहेत. पण यातून नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. 
 

Web Title: will bring Congress to power on its own in maharashtra says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.