शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 13:33 IST

Ravi shankar Prasad slams Maharashtra Government on 100 crore, Sachin Vaze Case: प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले. शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या की शरद पवारांच्या  (Sharad Pawar)  दबावातून वाझेला मुंबई पोलिस दलात आणले असा सवाल उपस्थित केला आहे. 

जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani)  यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी थेट बोलणे टाळणाऱ्या केंद्र सरकारने आज 100 कोटींच्या वसुलीवरून मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे  (Uddhav Thackreay)  सरकारवर जोरदार टीका केली आहे. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. (If Rs 100 cr was the target by Home Minister (Maharashtra) then what was the target by other ministers. Uddhav Thackeray’s govt has lost the moral authority to govern the State even for a day: Union Minister Ravi Shankar Prasad, in Patna)

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले. शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या की शरद पवारांच्या  (Sharad Pawar)  दबावातून वाझेला मुंबई पोलिस दलात आणले असा सवाल उपस्थित केला आहे. हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाहीय. हे ऑपरेशन लुटालूट आहे. हा वसुलीचा गुन्हा असून या प्रकरणात शरद पवारांना सत्तेचा हिस्सा नसताना माहिती पुरविली जात आहे. मग ते जर सत्तेचा भाग नाहीत तर त्यांना कोणत्या आधारे माहिती पुरविली जात आहे. दुसरी बाब म्हणजे शरद पवारांनी आपल्या स्तरावर काय कारवाई केली आहे, त्यांनी गुन्हा रोखण्यासाठी काय चौकशी केली आहे, असा सवाल प्रसाद यांनी केला. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र आहात. राज्यात तुम्ही बेईमानीचे सरकार स्थापिले आहे. बाळासाहेंबांच्या प्रतिमेला ठेच पोहोचेल असे वागत आहात. एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझेची (Sachin Vaze) बाजु मांडतात आणि त्यांचा गृहमंत्री त्याच वाझेला मला 100 कोटी (100 crore) रुपये आणून दे असे सांगतो. ही गंभीर बाब आहे. हे प्रकरण भाजपा गंभीरतेने घेणार आहे. या प्रकरणाची ईमानदारीने चौकशी होण्याची गरज आहे. यासाठी भाजपा महाराष्ट्रातील रस्त्यांवर उतरणार आहे, असे प्रसाद म्हणाले.

Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

तसेच या प्रकरणाची स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी झाली पाहिजे. कारण यामध्ये शरद पवार यांची भूमिका आणि मुंबई पोलिसांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या प्रकरणी अनेक प्रश्न विचारता येतील, असे प्रसाद म्हणाले. 

सचिन वाझेला वाचविण्यात येत होते अशी काय परिस्थिती आली होती. वाझेच्या पोटात काय काय रहस्य दडलेली आहेत. सस्पेंड इन्स्पेक्टरला शिवसेनेत आणले जाते त्यानंतर त्याला पोलीस सेवेत घेतले जाते हे संशयास्पद आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख कोणासाठी वसुली करत होते. आपल्यासाठी की राष्ट्रवादी काँग्रेससाठी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी ही वसुली केली जात होती, हे देखील शोधायला हवे असे प्रसाद यांनी म्हटले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेस