Robert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 22:07 IST2021-07-29T22:07:07+5:302021-07-29T22:07:50+5:30
Delhi Government against Rakesh Asthana: अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात दिल्ली विधानसभेत आज प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.

Robert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव
सीबीआयचे (CBI) माजी विशेष संचालक राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांची केंद्र सरकारने दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. याविरोधात दिल्ली सरकारने विधानसभेत प्रस्ताव पारित केला. यावेळी केंद्र सरकारने अस्थाना यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. (Delhi Assembly passes resolution against Rakesh Asthana’s appointment as police commissioner)
यावेळी आपचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendar Jain) यांनी भाजपावर (BJP) जोरदार हल्ला चढविला. भाजपाचे नेते म्हणत आहेत की राकेश अस्थाना यांनी सीबीआय प्रमुख असताना एका पक्षाच्या जावयावर कारवाई केली. परंतू सर्वजणांना माहिती आहे की या जावयावर काय आणि किती कारवाई झाली. भाजपा आणि काँग्रेसची आतून सेटिंग आहे. ज्या दिवशी हे जावई तुरुंगात जातील, त्याचा आधीच भाजपाची सरकार पडेल, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे उद्योजक पती रॉर्ट वड्रा (robert vadra) यांना जैन यांनी जावई संबोधले आहे. अस्थाना यांनी काही वर्षांपूर्वी रॉबर्ट वड्रा यांच्यावर काही गैरव्यवहारांवरून कारवाई केली होती. यानंतर काही दिवस हे प्रकरण तापले होते. प्रियांका गांधी आणि वड्रा यांना काही वेळा चौकशीलाही हजेरी लावावी लागली होती. यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण शांत झाले. हा मुद्दा जैन यांनी उचलला होता.
अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात दिल्ली विधानसभेत आज प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.