West Bengal Election amit shah slams cm mamata banerjee she will be fine and give her resignation by own | West Bengal Election : "२ मे पर्यंत ममता बॅनर्जींना झालेली दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील"

West Bengal Election : "२ मे पर्यंत ममता बॅनर्जींना झालेली दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील"

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणासध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत.

सध्या पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे सत्तेत येण्यासाठी भाजपनंही पूर्णपणे आपल्याला झोकून दिलं आहे. दरम्यान, रविवारी आयोजित एका रॅलीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "मी अशी अपेक्षा करतो की ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत २ मे पर्यंत ठीक होईल. जेणेकरून त्या राज्यपालांकडे आपला राजीनामा द्यायला जातील तेव्हा त्या आपल्या पायांवर चालत जातील," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. 

पहिल्या पाच टप्प्यांमध्ये १८० जागांसाठी मतदान पार पडलं. त्यापैकी १२२ पेक्षा अधिक जागांवर भाजपचाच विजय होईल, असा दावा शाह यांनी केला. तसंच मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या नंदीग्राममधील भाजप उमेदवाराकडून पराभूत होतील. त्यानंतर त्यांना या ठिकाणाहून जावं लागेल, असंही ते म्हणाले. "पाच टप्प्यांतील मतदानानंतर ममता बॅनर्जी निराश आहेत कारण भाजप १२२ जागांवर आघाडीवर आहे. शुभेंदु अधिकारी हेच नंदीग्राममधून निवडणूक जिंकतील. ममता बॅनर्जी यांना पराभवासोबतच रवाना केलं पाहिजे," असंही शाह म्हणाले. "तुमच्या आणि माझ्यासारखे लोकं दीदींसाठी दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, जे त्यांच्यासाठी वोटबँक म्हणून महत्त्वाचे नाहीत," असंही शाह म्हणाले. "दीदी म्हणतात की आम्ही सीएए येऊ देणार नाही. तुम्ही काय सीएए थांबवाल. २ मे रोजी तुमची रवानगी निश्चित आहे. २ मे रोजी भाजपला सरकार स्थापन करू द्या. प्रत्येक निर्वासीतांची गळाभेट घेऊन त्यांना नागरिकता देण्याचं काम भाजप करेल," असंही त्यांनी नमूग केलं. यापूर्वी बर्धमान जिल्ह्यातील आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यानही त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला होता. 

Web Title: West Bengal Election amit shah slams cm mamata banerjee she will be fine and give her resignation by own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.