शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 7:22 PM

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम सीटवर शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. यानंतर आता, त्या भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. आपल्या या पारंपरिक जागेवर ममता एकहाती विजय मिळवतील, असा दावा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. एवढेच नाही, तर भाजपने भवानीपूरमध्ये ममतांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये अन्यथा पैसे वाया जातील, असे टीएमसी नेते मदन मित्रा यांनी म्हटले आहे. (West Bengal CM Mamata Banerjee will contest the assembly bypolls from bhabanipur says TMC leader Madan Mitra)

मोदी फिर से... जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे.

ममतांची खुर्ची पणाला - ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टीकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होईल.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा