Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:19 AM2019-09-20T11:19:40+5:302019-09-20T13:10:27+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून मेळावे, उद्घाटनांचा सपाटा

Vidhan Sabha 2019: If the alliance breaks, BJP and Shiv Sena are ready for war face to face | Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देयुती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. समान जागा वाटपाचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्या तरी दोन्ही पक्षांत नाही. शिवसेना ४० टक्के आणि भाजप ६० टक्के, असे जागावाटपाचे सूत्र सध्या चर्चेत आहे. त्यामुळे युतीचे जागा वाटपातून बिनसले तर दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवारांना निवडणूक मैदानात होणाऱ्या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भाजपकडे जिल्ह्यातील नऊ जागांवर उमेदवार तयार आहेत, तर शिवसेनेकडेदेखील जिल्ह्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार आहेत. त्या तयारीतूनच उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सपाटा प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले. शिवसेनेचा मिशन १५० हा नारा त्यावेळी होता. भाजपला तो नारा मान्य नसल्यामुळे ऐनवेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. परिणामी, मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपला १५, तर शिवसेनेला ११ जागांवर यश आले. जिल्ह्यात भाजपला ३, शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले. एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. 

शिवसेनेने शहरातील पूर्व मतदारसंघातून राजू वैद्य, पश्चिममधून आ. संजय शिरसाट, मनोज गांगवे, मध्यमधून माजी आ. प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ यांची मुलाखत घेतली आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संतोष माने, वैजापूरमधून माजी आर.एम. वाणी आणि रमेश बोरनारे यांच्यापैकी एक, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, केतन काजे, तर सिल्लोडमधून माजी आ. अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून बाबासाहेब डांगे, जिजा कोरडे आदी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. 

भाजपनेदेखील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. पूर्व मतदारसंघातून राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडा सभापती संजय केणेकर, मध्यमधून किशनचंद तनवाणी, केणेकर, अनिल मकरिये, पश्चिममधून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे, फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे, वैजापूरमधून जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परेदशी,  कन्नडमधून संजय खंबायते, किशोर पवार,  गंगापूरमधून आ. प्रशांत बंब, किशोर धनायत, सिल्लोडमधून सुरेश बनकर, सांडू लोखंडे पैठणमधून तुषार पा. शिसोदे, डॉ. सुनील शिंदे अशी इच्छुकांची फौज भाजपकडे आहे.

युती तुटली तर काय ? 
युती तुटल्यानंतर गंगापूर मतदारसंघात शिवसेनेकडून जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांना मैदानात आणले तर विद्यमान आ. प्रशांत बंब यांच्यासमोरील अडचणी वाढतील. शिवाय भाजपमधूनही आ. बंब यांच्या विरोधात दिलीप बनकर यांनी शड्डू ठोकला आहे. ४पूर्वमध्ये राज्यमंत्री सावे यांना शिवसेनेचे वैद्य नाकीनाऊ आणतील. मध्यमध्ये माजी आ. जैस्वाल हे भाजपचे तनवाणी यांना त्रासदायक ठरतील. सिल्लोडमधून माजी आ. सत्तार यांच्या विजयाचे गणित भाजपच्या बनकर यांच्यामुळे बिघडेल, तर पश्चिममध्ये शिंदे किंवा गायकवाड हे आ. शिरसाट यांना जड जातील.पैठणमध्ये आ. संदीपान भुमरे यांना भाजपचे डॉ. शिंदे, शिसोदे हे रोखतील. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासमोर भाजपतून ऐनवेळी आयात होणाऱ्या सेना उमेदवाराचे आव्हान असेल. कन्नडमध्ये माजी आ. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे राजपूत, भाजपचे खंबायते यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. वैजापूरमध्ये भाजपने जाधव यांना उमेदवारी दिल्यास सेना भाजपमधूनच तगडा उमेदवार आयात करून आव्हान उभे करील.

Web Title: Vidhan Sabha 2019: If the alliance breaks, BJP and Shiv Sena are ready for war face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.