माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम

By मोरेश्वर येरम | Published: January 14, 2021 04:49 PM2021-01-14T16:49:07+5:302021-01-14T16:51:30+5:30

देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

underline my sentence to force the government to repeal agricultural laws says Rahul Gandhi | माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम

माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणाकृषी कायदे मागे घ्यायला सरकारला भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाहीमोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करत असल्याची केली टीका

तामिळनाडू
नव्या कृषी कायद्यांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. "तुम्ही माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, आम्ही कृषी कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, हे काळे कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही", असं ठाम मत राहुल गांधी व्यक्त केलं आहे. ते तामिळनाडूमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल यांधी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. "देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे", असं राहुल गांधी म्हणाले. 

शेतकरी देशाचा कणा
"देशातील शेतकरी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर तुम्हील शेतकऱ्यांना नाखूष ठेवून काही निर्णय घेणार असाल तर याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. तुम्ही इतिहास पडताळून पाहा. जेव्हा केव्हा भारतीय शेतकरी कमकुवत झाला आहे. तेव्हा संपूर्ण देश कमकुवत झाल्याचं आपण पाहिलं आहे", असं राहुल म्हणाले. 

"माझा शब्द लक्षात ठेवा"
राहुल गांधी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्याबाबत एक महत्वाचं विधान यावेळी केलं. "तुम्ही माझं हे वाक्य अधोरेखितच करुन ठेवा. कृषा कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. मी काय म्हणालो ते नीट लक्षात ठेवा", असं राहुल यांनी निक्षून सांगितलं.

चीनच्या प्रश्नावरुन मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी भारतीय हद्दीत चीनच्या घुसखोरीवरुनही पंतप्रधा नरेंद्र मोदींना काही सवाल विचारले आहेत. "भारताच्या भूभागात चीनचं सैन्य काय करत आहे? भारताच्या हद्दीत चीनचे लोक का ठाण मांडून बसलेत? आणि यावर पंतप्रधान चकार शब्द देखील का काढत नाहीत? चीनचं सैन्य भारतीय हद्दीत असल्याचं स्पष्टपणे दिसत असतानाही पंतप्रधान मोदी शांत का?", असे सवाल राहुल गांधी यावेळी उपस्थित केले आहेत. 
 

Web Title: underline my sentence to force the government to repeal agricultural laws says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.