शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

Uddhav Thackeray: “एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?”; भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 12:05 IST

BJP Criticized CM Uddhav Thackeray: वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा अशी टीका भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

ठळक मुद्देआता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोयमुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का?

मुंबई - स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे.(BJP Keshav Upadhye Target Thackeray government & CM Uddhav Thackeray)  

केशव उपाध्ये म्हणाले की, आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? असा चिमटाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है‘ शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते. येथे बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई, मोदींकडून कौतुक!

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली व दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केलं असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य कसे नियोजन करीत आहोत, त्या विषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून, त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र ट्विटरवर शेअर केले. यामध्ये "मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावे", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस