Udayan Raje's controversial statement once again, said, I am not like that, but ... | उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर...

उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर...

सातारा - आपल्या वक्तव्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ग्रेड सेपरेटरच्या वादाबाबत बोलताना उदयनराजेंनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

ग्रेड सेपरेटरच्या वादावर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले की, हा मुद्दा सोडवण्यासाठी वेळ लागणारच. मूल होण्यासाठीही नऊ महिने लागतात. त्यासाठी त्रास सहन करावा लागतो. हा तर ग्रेड सेपरेटरचा विषय आहे आहे. त्यासाठी वेळ लागेलच.

आता मंत्र्यांनी उदघाटन करावं का हा विषय आहे. तर मंत्री असले तरी तेसुद्धा आमदार, खासदार असतात. मीसुद्धा खासदार आहे. मी असा तसा खासदार नाही तर खाज असलेला खासदार आहे, असे विधान उदयनराजे यांनी केले आहे.

Web Title: Udayan Raje's controversial statement once again, said, I am not like that, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.