"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 05:58 PM2020-10-23T17:58:59+5:302020-10-23T18:00:20+5:30

Eaknath Khadse : खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

"Tiger is alive, picture is yet to come", NCP warns Fadnavis after Khadse joins party | "टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा

"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

मुंबई :  भाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता सूचक इशारा दिला. जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळले असेल की 'टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है' असे जयंत पाटील म्हणाले.

याचबरोबर, "अनेकांना शरद पवार यांनी घडवलं, त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला. सोडून गेले, शरद पवार यांना ईडीची नोटीस दिली. सुडाचे राजकारण करण्यात आले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल," असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

याशिवाय, यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले. काही निवडक लोकांनाचा कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला होती, त्यामुळे कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती. तर तब्येतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते.
 

Web Title: "Tiger is alive, picture is yet to come", NCP warns Fadnavis after Khadse joins party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.