'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:48 PM2021-08-05T18:48:06+5:302021-08-05T18:48:46+5:30

Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

'There is no question of going under anyone's jurisdiction, I am acting according to the constitution', says bhagat singh koshyari | 'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय'

'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय'

Next
ठळक मुद्दे राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलंय.

नांदेड: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. आता राज्यपालांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रत्युत्तर दिलंय. 'मी संविधानानं दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय. कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं राज्यपाल म्हणाले.

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. 

राज्यपालांचे प्रत्युत्तर
नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यात बैठका नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती राज्यपालांनी दिली. तसेच, मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार, असं राज्यपालां म्हटलं.

Web Title: 'There is no question of going under anyone's jurisdiction, I am acting according to the constitution', says bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.