शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 8:34 PM

सत्तेत परतण्यासाठी एम.के.स्टालिन यांनी लावला जोर. पलानिसामीही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील.

ठळक मुद्देसत्तेत परतण्यासाठी एम.के.स्टालिन यांनी लावला जोर.पलानिसामीही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील.

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल येत्या २ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलीआहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी मतदान पार पडलं. या ठिकाणी ३९९८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. AIADMK चं नेतृत्व करत असलेल्या पलानीस्वामी यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. तर एका दशकानंतर डीएमकेला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी स्टालिनदेखील प्रयत्न करत आहेत. अशातच तामिळनाडूमध्ये बदल घडणार, की AIADMK च्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत येणार याचा निर्णय २ मे रोजी होईल. तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच करूणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय या निवडणुका पार पडल्या. राज्याचं राजकारण कायमच AIADMK आणि DMK या दोन पक्षांच्या भोवती होतं. परंतु यावेळी अन्य काही पर्यायही होते.  असं असलं तरी यावेळी तामिळनाडूत AIADMK आणि DMK या दोन पक्षातच मुख्य लढत होत असताना दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपासारख्या पक्षांचा या ठिकाणी तितक्या प्रमाणात जोर नाही.यावेळी पुन्हा एकदा स्टॅलिन यांनी बाजी मारल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस-माय-इंडियाच्या एक्झिट पोलनुसार डीएमकेच्या नेतृत्वाखालील आघाडीला १७५ ते १९५ पर्यंत जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सत्ताधारी AIADMK आणि अन्यना ३८ ते ५४ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं एक्स्झिट पोलनुसार दिसून येत आहे. तर टुडेज चाणक्यच्या आकडेवारीनुसार राज्यात सत्ताधारी पक्षाला ४६ ते ६८ आणि DMK+ ला १६४ ते १८६ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.२०१६ मध्ये AIADMK चा विजययापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये २३४ पैकी AIADMK आणि अन्य मिळून १३४ जागांवर विजय मिळवला होता. तर डीएमके आघाडीला एकूण ९८ जागा मिळाल्या होत्या. यावेळी अभिनेता ते नेता असा प्रवास केलेल्या कमल हासन यांचा पक्षही निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. त्यांच्या मक्कम निधि मय्यम या पक्षानं १८० जागांवर निवडणूक लढवली होती. तर त्यांचा सहकारी पक्ष आयजेकेनं ३७ जागांवर निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएननं तीन जगांवर निवडणूक लढवली होती. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kamal Hassanकमल हासनBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021