शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:20 AM

Tamil Nadu Assembly Elections 2021 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

सलेम (तामिळनाडू) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. (Tamil Nadu Assembly Elections 2021) तमिळनाडूसारखी भाजपविराेधी युती काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर तयार करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी घ्यावी, असे ते म्हणाले. येथे ६ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचारसभेत बोलताना स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सांप्रदायिक आणि फासीवादीच्या जोरावर भारताचा जीव घुटमळत आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्यावर देशाला वाचविण्याची मोठी जबाबदारी आहे. ( Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice)येथे निवडणुकीच्या प्रचारातील पहिलीच सभा हाेती. द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष प्रगतिशील युतीतील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होेते. यामध्ये राहुल गांधीही सहभागी आहेत.दुसरीकडे सत्तारूढ अण्णा द्रमुक, भाजप, पीएमके, माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांची तमिळ मनीला काँग्रेस (मूपानार) सह अन्य लहान पक्षांसह आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. स्टॅलिन म्हणाले, भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमधून एकही जागा जिंकली नाही. कारण द्रमुकच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले होते. या निवडणुकीतही आमच्या आघाडीकडून भाजपचा दारुण पराभव होईल, असे स्टॅलिन म्हणाले.  ते म्हणाले, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३७ टक्के मते मिळाली हाेती. यावरून ६३ टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात इतर पक्षांना मतदान केल्याचे स्पष्ट होते. या निवडणुकीत भगवा पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आघाडी नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांनीही भाजपविरोधी राष्ट्रीय स्तरावर आघाडी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनी देशभरात यासाठी तत्काळ दौरे केले पाहिजेत. राहुल गांधी यांनी सर म्हणू नका, असे सांगितले असल्याचेही स्टॅलिन यांनी सभेत सांगितले. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमcongressकाँग्रेस