शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 2:15 PM

West Bengal Election 2021: स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal assembly Election) दिवसेंदिवस रंगतदार आणि तेवढीच घडामोडींची होऊ लागली आहे.  केंद्रात सत्ताधारी भाजपा (BJP) आणि राज्यातील सत्ताधारी तृमणूल (TMC) अशा दोन ताकदवान पक्षांमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळत आहे. यातच भाजपाने नामांकित राज्यसभा खासदाराला उमेदवारी दिल्याने राज्यसभेत आज मोठा गोंधळ उडाला. आमदारकीसाठी पश्चिम बंगालमधील मोठी हस्ती असलेल्या स्वपन दासगुप्ता  (Swapan Dasgupta) यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. (Bjp Candidate Swapan Dasgupta Resigned from Rajyasabha MP for west Bengal Election.)

भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. स्वपन दासगुप्ता हे कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत. ते नामांकित सदस्य आहेत. अशा सदस्यांना कोणत्याही पक्षात प्रवेश करता येत नाही. पश्चिम बंगालमध्ये 6 एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी रविवारी भाजपाने 26 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये दासगुप्तांचे नावदेखील होते. यावर तृणमूल काँग्रेसने आज राज्यसभेत आक्षेप घेतला होता. 

स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून पहिल्यांदा यावर आक्षेप घेतला. राज्यघटनेच्या 10 व्या तरतुदीनुसार जर एखादा राज्यसभेचा नामांकित सदस्य शपथ घेतल्यानंतर आणि 6 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर जर कोणत्याही राजकीय पक्षात जात असेल तर त्याचे राज्यसभा सदस्यपद अयोग्य घोषित केले जाईल. असे असताना दासगुप्ता यांना एप्रिल 2016 मध्ये शपथ देण्यात आली होती. आता त्यांना भाजपात जाण्यामुळे अयोग्य घोषित केले जायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले. यावरून राज्यसभेत गदारोळ होताच स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेचे सभापती एम. एम. वेंकय्या नायडू यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. 

दासगुप्ता यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे 2015 मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दासगुप्ता यांच्यासह आणखी तीन खासदार भाजपाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाtmcठाणे महापालिकाRajya Sabhaराज्यसभा