शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 11:46 IST

West Bengal: काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे.

ठळक मुद्देकाही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झालाजमिनीवरील परिस्थिती माहिती घेतली नाहीसुवेंदू अधिकारी यांचा भाजपला घरचा अहेर

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन महिने उलटून गेले, तरी राजकीय वर्तुळात यासंदर्भातील चर्चा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले काही नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर भाजपवर विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी करण्यात आली. आता मात्र ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटून विजयी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनीच आता भाजपला घरचा अहेर दिला आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. (suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders) 

सुवेंदू अधिकारी हे भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंदू अधिकारी यांच्या जास्तच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच पक्षाचा पराभव झाला. अती आत्मविश्वासामुळे मूळ जमिनीवर असणारी परिस्थिती समजून घेता आली नाही, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी चांदीपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुनावले.

भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

जमिनीवरील परिस्थिती माहिती घेतली नाही

आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र, त्यानंतर आपल्या काही नेत्यांना भाजपला १७० ते १८० जागा सहज मिळवेल, असा विश्वास वाटू लागला. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे अधिकारी म्हणाले. 

नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कल्याणकारी प्रकल्प आणि विकासाच्या कामांचा सुवेंदू अधिकारी यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. भाजप स्वप्नात जगत आहे, कारण त्यांच्या अनेक नेत्यांनी २०० हून अधिक जागा मिळतील असे वाटले होते. ते इतरांमध्ये दोष का शोधत आहेत? सुवेंदू अधिकारी यांनीदेखील १८० जागा मिळतील असे वारंवार म्हटले होते. खरे तर त्यांनी बंगालची मुख्य नाडी माहिती नाही, जी तृणमूल काँग्रेसला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया कुणाल घोष यांनी दिली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण