Sushant Rajput: “Why did Maharashtra government hide an important thing ?; BJP MLA's letter to CM | “एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने दडवून का ठेवली?; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने दडवून का ठेवली?; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्देया प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही६५ दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? सरकारच्या मंत्र्याचा पवित्रा या प्रकरणात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा आहे हे दुर्देव आहे.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कुरघोडी संपण्याची चिन्हे दिसत नाही. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव असून कोणाला तरी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करतंय असा भाजपा नेत्यांनी केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणावरुन भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.

आता या प्रकरणात भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे ६५ दिवस होता. या काळात रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील ड्रग्स संदर्भातील गंभीर व्हॉट्सअप चॅट उपलब्ध असतात महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं? ६५ दिवसांमध्ये एकालाही अटक केली नाही, संपूर्ण देशाच्या युवा पिढीच्या दृष्टीकोनातून ड्रग्स हा विषय अंत्यत गंभीर आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही, अशी देशातील कोट्यवधी जनतेची मानसिकता आहे. म्हणूनच ६५ दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? ६५ दिवसांनी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्यानंतर ड्रग्स प्रकरणात १९ पेक्षा अधिक जणांना तुरुंगात जावं लागले. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता म्हणून सरकारचे नेते आणि सरकार वागत होते तिलाही तुरुंगात जावं लागतं हे सर्व देशाने पाहिलं असा टोला राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या संशयास्पद वागण्यामुळे शौर्यची परंपरा असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा दुस्साहस कुकर्म किंबहुना पाप महाराष्ट्र सरकारच्य हातून घडलं हे नाकारता येणार नाही. एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने का दडवून ठेवली? सरकारच्या मंत्र्याचा पवित्रा या प्रकरणात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा आहे हे दुर्देव आहे. ड्रग्सचा विषय दाबला की, नजरेतून सुटला हे प्रश्न अनुत्तरीत आहे. महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलिसांची माफी मागत याची उत्तर द्यावी लागतील असंही आमदार राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आमदारांनी भाजपा नेत्यांवर केली होती टीका

सुशांत सिंह प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या आहे असं एम्सने सीबीआयला रिपोर्ट दिल्याचं सांगितलं गेलं, त्यानंतर सत्ताधारी नेते आक्रमक झाले, याप्रकरणी आमदार रोहित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं तर  बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फिरलंय, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असं रोहित पवार म्हणाले होते.

Read in English

Web Title: Sushant Rajput: “Why did Maharashtra government hide an important thing ?; BJP MLA's letter to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.