शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

'राज्याचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसलेत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:18 IST

Chandrakant Patil reaction on flood situation: 2019 मध्ये पूरस्थितीत आम्ही फिल्डवर जायचो, बोटीत बसून निर्णय करायचो

ठळक मुद्दे'उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे.'

अहमदनगर: महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakecray) घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पावसामुळे अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही. मी सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही, पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत, असं ते म्हणाले. 

आम्ही थेट फिल्डवर जायचोपाटील पुढे म्हणाले की, जेव्हा 2019 साली राज्यात महापूर आला होता, तेव्हा 15 दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) थेट फिल्डमध्ये जायचो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :floodपूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊसBJPभाजपाShiv Senaशिवसेना