दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:50 IST2020-10-12T23:49:59+5:302020-10-12T23:50:13+5:30

Khusabu Sundar Join BJP News: खुशबू सुंदरने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला.

Southern actress Khushboo Sundar in BJP; Leave Congress, accused of muscat pressure | दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप

दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप

चेन्नई : तामिळनाडूमध्ये गेल्या महिनाभरापासून जी शक्यता वर्तविण्यात येत होती ती सोमवारी खरी ठरून अभिनेत्री खुशबू सुंदर हिने काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. तामिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुका पुढील वर्षी मे महिन्यात होणे अपेक्षित असले तरी भाजपसह सर्वच पक्षांनी आतापासून पूर्वतयारी सुरू केली आहे.

खुशबू सुंदरने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला. त्या पत्रात खुशबूने म्हटले आहे की, जनतेशी काडीचाही संपर्क नसलेल्या काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला.



असा आहे प्रवास...
हिंदी, तामिळ व अन्य दाक्षिणात्य चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर हिने २०१० साली द्रमुक पक्षात प्रवेश केला. तेथील अंतर्गत राजकारणाला कंटाळून २०१४ साली तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, केंद्रातील सत्ता गेल्यानंतर त्या पक्षाला तामिळनाडूतही उतरती कळा लागली होती. काँग्रेस पक्षातही वाव नाही हे लक्षात आल्यावर खुशबूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

Web Title: Southern actress Khushboo Sundar in BJP; Leave Congress, accused of muscat pressure