"काही पोलीस अधिकारी जुन्या सरकारशी एकनिष्ठ; फडणवीसांचा अहवाल फुसका"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:34 AM2021-03-25T06:34:12+5:302021-03-25T06:34:43+5:30

दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला पाहिजे. महाराष्ट्राची दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे.

"Some police officers loyal to old government; Fadnavis' report fuzzy" | "काही पोलीस अधिकारी जुन्या सरकारशी एकनिष्ठ; फडणवीसांचा अहवाल फुसका"

"काही पोलीस अधिकारी जुन्या सरकारशी एकनिष्ठ; फडणवीसांचा अहवाल फुसका"

googlenewsNext

विकास झाडे

नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलीस ही सरकारची शक्ती आहे; परंतु काही अधिकारी असे आहेत की, ते जुन्या सरकारशी एकनिष्ठ आहेत. भाजप आणि संघाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची आमच्याकडे पक्की माहिती असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपवर टीका करताना खा. राऊत म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृह सचिवांकडे सादर केलेल्या अहवालात जराही दम नाही. तो एक भिजलेला व वात नसलेला लवंगी फटाका आहे. आम्ही शोधतोय कुठे स्फोट झाला.

दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला पाहिजे. महाराष्ट्राची दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे विनाकरच मनोरंजन होत आहे. फडणवीसांच्या कृतीकडे आम्ही गंमत म्हणून पाहतो. कोणत्याही अधिकाऱ्याचे आक्षेपार्ह संभाषण झाले असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचे गृहखाते चौकशीसाठी सक्षम आहेत. फोन टॅपिंगच्या अहवालात काडीचाही दम नाही. त्याचा तपास करण्यास राज्य सरकार सक्षम आहे.

Web Title: "Some police officers loyal to old government; Fadnavis' report fuzzy"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.