शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:34 IST

पवार-चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात विरोधी पक्षांची आघाडी तयार करणे, हे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासाठी दु:स्वप्न ठरताना दिसत आहे. छोटे पक्ष दोन्ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.शरद पवार यांच्याकडे आघाडीची जबाबदारी आहे. छोट्या पक्षांना समजावण्यात त्यांना अडचण येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला ४ जागा देण्याची दोन्ही काँग्रेसची तयारी आहे. आंबेडकर १२ जागा मागत आहेत. राजू शेट्टींसाठी एक जागा देण्यास राष्ट्रवादी तयार असून, काँग्रेस आपल्या कोट्यातील जागा देण्यास तयार नाही. बहुजन विकास आघाडीस काँग्रेस जागा सोडायला तयार नाही.ओवेसी यांचा एमआयएम बहुजन वंचित आघाडीत असला, तरी राज्यात एकही जागा लढविणार नाही. पण, आंबेडकर हे ओवेसी यांच्या हातचे बाहुले बनल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते. त्यांची आघाडी भाजपाच्या इशाऱ्यावर मतविभागणीचा प्रयत्न करते, असा काँग्रेस-राष्ट्रवादीला संशय आहे. आंबेडकरांना ४ जागा मिळू शकतात; पण त्यांना ८ जागा हव्या आहेत. सपा-बसपाला कोणत्या जागा द्यायच्या, हाही प्रश्न आहे. शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. तथापि, सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यात त्यांना यश न आल्याने आघाडीत बिघाडी होईल की काय, अशी चर्चा सुरू आहे.प्रफुल्ल पटेल रिंगणात नाहीत?राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते राज्यसभेचे सदस्य असून, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन काहीच साध्य होणार नाही, असे पक्षाला वाटते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन