Goa Politics: “एका तिकिटावर निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:15 PM2021-10-01T14:15:57+5:302021-10-01T14:16:52+5:30

पणजी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, युती आणि आघाडीचं राजकारण न करता गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत.

Shivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics | Goa Politics: “एका तिकिटावर निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं लागेल”

Goa Politics: “एका तिकिटावर निवडून यायचं अन् निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे थांबवावं लागेल”

Next
ठळक मुद्देआमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. शक्यतो निर्लज्जांना शिवसेना घेत नाहीगोव्यात चांगली राजकारणी झालेत. इथं परंपरा आहे. परंतु आत्ताचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेले आहे मागील निवडणुकीत आमच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. आम्ही आघाडीत निवडणूक लढवली.

गोवा – उत्तर प्रदेशपाठोपाठ शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी गोव्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवर शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. एका तिकिटावर निवडून यायचं आणि निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची हे थांबवावं लागेल. गोव्यातील जनतेनं हे रोखलं पाहिजे. पक्षांतर कसं थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. आणखी किती काळ गोव्यात पक्षांतर चालणार? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

पणजी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, युती आणि आघाडीचं राजकारण न करता गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. शक्यतो निर्लज्जांना शिवसेना घेत नाही. एका पक्षातून निवडून येत दुसऱ्या पक्षात उडी मारायची हा खेळ गोव्यात सुरू आहे. गोव्यात चांगली राजकारणी झालेत. इथं परंपरा आहे. परंतु आत्ताचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेले आहे असं त्यांनी आरोप केला. संजय राऊत यांच्यासोबत खासदार राहुल शेवाळेही यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

तसेच मागील निवडणुकीत आमच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. आम्ही आघाडीत निवडणूक लढवली. ज्याठिकाणी शिवसेनेचा काही संबंध नाही अशा जागा आमच्या वाट्याला आल्या. परंतु आम्ही लढलो. राजकारणात इकडून तिकडे उड्या मारण्याचे खेळ अगदी दिल्लीपर्यंत सुरू आहेत. कोणी कुठंही उडी मारतो पण त्यातून गोव्याच्या हाती काय लागणार? गोवेकरांनी नवीन पर्याय उभे केले जात आहे त्यांना साथ द्यायची की नाही हे शेवटी जनताच ठरवेल असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचे गोव्यात प्राबल्य आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title: Shivsena Sanjay Raut Targeted BJP over Goa Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.