शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut on Nana Patole: नाना पटोले राज्यातील महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:31 IST

sanjay raut's reaction on nana patole's statement: 'प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो'

ठळक मुद्दे 'नानांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल, असे मला वाटत नाही'

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. या आरोपामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'नाना पटोले महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहे. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी ही बाब फार गांभीर्याने घेऊ नये', असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे. 

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना नाना पटोलें(Nana Patole)च्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, नानांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल, असे मला वाटत नाही. मुळात, राजकारणात पाळत ठेवणे, याचे खूप वेगवेळे अर्थ निघतात. राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेची माहिती सरकारकडून घेतली जाते. मलाही सुरक्षा आहे, माझीही माहिती सरकारकडे असेल, असे राऊत म्हणाले.

नानांनी गांभीर्याने घेऊ नयेराऊत पुढे म्हणाले, मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर कुठे जातो? काय करतो? एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे धोका आहे का? याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले(Nana Patole) हे राज्यातील अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये. अशी विधाने होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते नाना पटोले ?

नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच, आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले होते. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस